Friday, 23 March 2012

व्यवधान

व्यवधान


तोच वारा तोच तारा
अन्‌ तोच आसमंत सारा
स्थल काल मितीची
भेदू कशी अभेद्य कारा..


जाणिवांच्या जाळ्याला जुनकट
पेलवेल का अवकाश हे
वस्तुमानाची वक्र वर्तुळे
घेरती  अनुमान हे

एका बिंदूमध्ये माझे
अस्तित्व म्हणे ठासून होते
बुडबुड्याचा स्फोट होता
कालसर्प फुत्कारत होते

प्रकाशाचा फुफाटा उठतो
अज्ञान परि दृगोचर नसते
अंतरातल्या प्रतिविश्वाचे
अंतरालाही व्यवधान नसते

- अभिषेक

No comments:

Post a Comment