Wednesday, 9 June 2010

किटकूल

किटकूल


एक किटकूल चालू लागे
रडत खडत उठत पडत
दगडांवरून गोट्यांवरून
पानांवरून सरकत सरकत

जळल्या नद्या विझल्या वाती
उरली सुरली घरे आटती
गावाला मग मूठभर माती
देण्या उरले किटकूल फक्त

ना डसे कुणा ना बसे कधी
चुकूनही ना हसे कधी
चालले एकटे रस्ता संगत
धुळीमध्ये रेघोट्या ओढत

टाच कुणाची पायावरून
गेली तेव्हा आले भरून
वदावा परी कुणा शोकश्लोक
सदा अपुली एकट्याचीच पंगत

गोष्ट आहे जुनी फार
अगणित वर उलटले वार
किटकूल अजून चालतेच आहे
रडत खडत उठत पडत

- अभिषेक अनिल वाघमारे